धक्कादायक ! पुण्यात पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार ?
VIDEO | पुण्यात पुन्हा मजारचा वाद, पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार? व्हिडीओ व्हायरल
पुणे : पुण्यात पुन्हा मजारचा वाद समोर आला आहे. पुण्यातील पर्वती मंदिराच्या पायथ्याशी आढळली अनधिकृत मजार आढळली आहे, असा आरोप होतोय. तसा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या मजारावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तर पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार असलेली जागा वनविभागाची असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यात पर्वती मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत मजारीचा इतिहास मात्र अस्पष्ट आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मजारीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या अनधिकृत मजारी विरोधात भाजपसह हिंदू संघटना मात्र आक्रमक झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने वनाधिकारी राहुल पाटील यांची भेट घेतली आहे. पुण्यातील पर्वती मंदिराच्या पायथ्याशी एक अनधिकृत मजार आढळून आल्यानंतर भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ज्या जागेवर ही मजार आहे ती जागा पर्वती देवस्थानाची नाही, असे देवस्थानाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे. ही संबंधित जागा वनविभागाची असल्याची प्राथमिक माहिती असून वनविभागाकडून निवेदन स्वीकारत चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.