Pune | बस चालवताना चालकाला आले फिट, प्रवासी महिलेने चालवली बस
चालकाला बस चालवताना फिट आल्यानंतर बसमधील महिलेनेच बसच स्टेरिंग हातात घेत बस चालवली आहे. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले आहेत. वाघोली येथील महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी निघाला होता, यावेळी ही घटना घडली.
पुणे : चालकाला बस चालवताना फिट आल्यानंतर बसमधील महिलेनेच बसच स्टेरिंग हातात घेत बस चालवली आहे. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले आहेत. वाघोली येथील महिलांचा ग्रुप पर्यटनासाठी निघाला होता. या वाहनातील चालकाला गाडी चालवत असताना अचानक फिट आले. त्यामुळे त्याने गाडी जागेवरच थांबवली. मात्र अशा परिस्थितीत गाडी कोण चालवणार हा मोठा प्रश्न सर्व महिलांसमोर होता. मात्र या प्रसंगात पर्यटनासाठी आलेल्या योगिता सातव यांनी क्षणाचाही विलंब न करता बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतले. फिट आलेल्या चालकाला त्यांनी उपचारासाठी नेले आणि महिलांना वाहन चालवत इच्छित स्थळी पोहचवले. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.