VIDEO : पुणेकरांनी नावं ठेवताना देवानांही सोडलं नाही : अजित पवार
अगदी सातच्या कार्यक्रमाला अजित पवार दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले. त्यावरही त्यांनी टोला लगावत 'जे सूर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील', असं म्हटलं. तर मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतो, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
पुणे : नाव ठेवण्याच्या बाबतीत पुणेकरांचा हात कोणीही धरु शकत नाही. ढोल्या मारुती ते उपाशी विठोबा, पुणेकरांनी नावं ठेवताना देवानांही सोडलं नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरखळ्या लगावल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. वारजे परिसरात वन विभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहे. सकाळी सात वाजता अजित पवार कार्यक्रम स्थळी हजर झाले. अगदी सातच्या कार्यक्रमाला अजित पवार दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले. त्यावरही त्यांनी टोला लगावत ‘जे सुर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील’, असं म्हटलं. तर मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतो, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.