मनसेचा पंजाबी तालुक्याध्यक्ष; राज ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केलेला ‘तो’ सरदार नेमका आहे कोण?

| Updated on: Aug 16, 2023 | 4:15 PM

VIDEO | राज ठाकरे यांच्याकडून 'या' पंजाबी सरदाराचा गौरव, 'कोकणातील मंडणगडचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष सरदार आहे. त्याच्या बोलताना लक्षात पण येणार नाही की तो सरदार आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पनवेल, १६ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज पनवेल शहरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी मनसे येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. तर समृद्धी महामार्ग, मुंबई – गोवा महामार्ग आणि विकासाच्या मुद्द्यावर सरकारला चांगलंच घेरलं. यावेळी भाषण करत असताना राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक अमराठी लोकं असल्याचे सांगत त्यांनी कोकणातील मंडणगडच्या तालुकाध्यक्षांचं नाव घेतलं. “कोकणातील मंडणगडचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष सरदार आहे. त्याच्या बोलताना लक्षात पण येणार नाही की तो सरदार आहे. तो पूर्ण मराठी आहे, त्याचे घरही मराठी आहे” असा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आणि त्याचा एकप्रकारे गौरवच केला. बघा कोण आहे तो सरदार ज्याचं राज ठाकरे यांनी भाषणातून कौतुक केले.

Published on: Aug 16, 2023 04:07 PM
Raj Thackeray : मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खडे; चांद्रयानावरून राज ठाकरे यांचे सरकारला चिमटे
‘टोलनाका फोडल्यावरून बोलणाऱ्यांनी आधी पक्ष बांधायला शिका’; राज ठाकरे यांचा भाजपला खरमरित सल्ला