Ratnagiri | मंत्र्यांची पाठ फिरली आणि बोर्डची लगेच तोडफोड, पण का?
VIDEO | रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गावात मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन केलेल्या बोर्डची आणि पथदिव्यांची तोडफोड करण्यात आली आहे. इतकेच नाहीतर मंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेले बॅनर देखील अज्ञातांनी फाडले, कुणी केली तोडफोट अन् नेमकं कारण काय?
रत्नागिरी, १० ऑक्टोबर २०२३ | रत्नागिरी जिल्ह्यात मंत्र्यांची पाठ फिरली आणि मंत्र्यांनीच उद्घाटन केलेल्या बोर्डची लगेच तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गावात फलकांची आणि पथ दिव्यांची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन केलेल्या विद्युत बोर्डाची तोडफोड करण्यात आली. मंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेले बॅनर देखील अज्ञातांनी फाडले आहे. 22 सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गावात भूमिपूजन झाले होते. गावात विकासासाठी एक कोटी तेरा लाखाचा निधी देण्यात आला होता. आपलं पुर्ये असं नाव असलेल्या विद्युत बोर्डाची देखील अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. घडलेल्या या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. ग्रामस्थांनी पोलिसांकडे संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात साखरपा पोलिसांना देखील निवेदन देण्यात आले.