मातोश्रीवर कार्यकर्त्यांची रांग! शिवसैनिकाकडून अनोखं गिफ्ट
शिवसैनिक उद्धव ठाकरेंना भेटायला आतुर झालेत. मातोश्रीबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना अतिशय सुंदर गिफ्ट दिलंय. बघाच!
मुंबई: आज शिवसेना पक्ष प्रमुखांचा वाढदिवस. शिवसैनिक उद्धव ठाकरेंना भेटायला आतुर झालेत. मातोश्रीबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना अतिशय सुंदर गिफ्ट (Gift) दिलंय. बघाच! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कालपासूनच मातोश्रीवर कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. ढोलताशे वाजवत शिवसैनिकांकडून (shivsena) त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा गुच्छ देण्याऐवजी प्रतिज्ञापत्रांची भेट दिली आहे. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Published on: Jul 27, 2022 01:31 PM