‘जर्सी क्रमांक 99 मिस…’; आर अश्विनच्या निवृत्तीवर PM नरेंद्र मोदी यांचं भावनिक पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू आर. आश्विनला एक भावनिक पत्र लिहीले आहे. माजी क्रिकेटपटू आर. आश्विन याने आपली क्रिकेट विश्वातील निवृत्ती जाहीर केल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे त्याला पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर. आश्विन याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात ‘अशा वेळी जेव्हा प्रत्येक जण तुझ्याकडून […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू आर. आश्विनला एक भावनिक पत्र लिहीले आहे. माजी क्रिकेटपटू आर. आश्विन याने आपली क्रिकेट विश्वातील निवृत्ती जाहीर केल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे त्याला पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर. आश्विन याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात ‘अशा वेळी जेव्हा प्रत्येक जण तुझ्याकडून अधिक ऑफ ब्रेक टाकण्याची आशा करत होता, तेव्हा तू एक असा कॅरम बॉल टाकला की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आता क्रिकेटप्रेमी जर्सी क्रमांक ९९ मिस करतील’, असे त्यांनी म्हटले. तर जेव्हा तुझ्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला तो क्षण आम्हा सर्वांना आठवतो. तुम्ही मैदानात परतलात. जेव्हा चेन्नईमध्ये पूरस्थिती होती आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुम्ही ज्या प्रकारे खेळलात ते या खेळाप्रती तुमची बांधिलकी दर्शवते, असे म्हणत मोदींनी रविचंद्रन अश्विनला शुभेच्छा देत भावनिक पत्र लिहीत त्याचे तोंडभरून कौतुक केले.