शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, राऊत विरुद्ध सोपल आमने-सामने; बार्शीतील राजकारण तापलं

| Updated on: Nov 08, 2024 | 11:09 AM

सोलापूर येथील बार्शीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारामध्ये राडा झालाय. शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांना दिलीप सोपल यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केल्याने बार्शीतील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Follow us on

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यमाध्ये आपले दंड थोपटून चॅलेंज देणारी ही व्यक्ती शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांचं घर आहे. घराबाहेर राऊत समर्थकांचा शेकडो गाड्यांचा ताफा थांबवून सोपलांच्या विरोधात घोषणाबाजी करत होता. सोलापूरच्या बार्शीमध्ये गेल्या वेळी भाजप पुरस्कृत अपक्ष जिंकलेले राजेंद्र राऊत यंदा शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकीटावरून विधानसभा लढणार आहेत. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून दिलीप सोपल यांच्याविरोधात तिकीट दिलंय. काल राऊत यांनी बार्शीतील एका गावात सभा घेतली. सभा आटपून राऊत समर्थक सोपल यांच्या घराबाहेरून जात होते. त्याच वेळी सोपलांच्या भावाने समर्थकांकडे बघून अश्लील हावभाव केलेत. त्यामुळेच समर्थक आक्रमक होऊन तिथे घोषणाबाजी केली असा दावा राऊत यांनी केला. दरम्यान, दंड थोपटत सोपल यांच्या घराबाहेर आमदारांचा मुलगा दहशत माजवत असल्याचा आरोप झालाय. तर आपला मुलगा वकील असल्याचे म्हणत दहशतीचा प्रश्न येत नाही, असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट