‘सुना है दुश्मनों की गली में आज कल…’, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शायरीतून कोणावर साधला निशाणा?

| Updated on: Sep 15, 2023 | 4:49 PM

VIDEO | ख्वाजा पीर मोहम्मद यांचा उरूस सुरू असल्याने कव्वालीच्या एका कार्यक्रमात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शेरोशायरीच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल..

अहमदनगर, १५ सप्टेंबर २०२३ | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. असे कोणतेही व्यासपीठ नाही की दोघे एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. संगमनेर शहरातील ख्वाजा पीर मोहम्मद यांचा उरूस सुरू असल्याने कव्वालीच्या कार्यक्रमात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ‘सुना है दुश्मनों की गली में आज कल मातम है’ असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या शायरीला सुरूवात केली. ते म्हणाले, ‘सुना है दुश्मनों की गली में आज कल मातम है । लो हम आ गये विकास का सुरज रोशन करेंगे । ये आज का वादा है’. अशी शेरोशायरी करून विखे पाटील यांनी थोरातांवर खोचक टीका केली तर उपस्थितांनी टाळ्या वाजवून विखे पाटील यांना दाद दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Sep 15, 2023 04:49 PM