Radhakrishna Vikhe Patil मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत, थेट दर्ग्यात कुणी केली प्रार्थना?
tv9 Special report | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 'सीएम'पदासाठी दर्ग्यात कुणी केली प्रार्थना? यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यावर शायरीतून साधलेल्या निशाण्यावर थोरात यांनी काय काढला चिमटा?
अहमदनगर, १६ सप्टेंबर २०२३ | आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी कार्यकर्ते पोस्टरबाजी करताना दिसताय. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी थेट दर्ग्यात त्याच्याच समोर प्रार्थना करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. 2024 ला राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी संगमनेरच्या दर्ग्यात खास प्रार्थना करण्यात आली. संगमनेरच्या ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्ग्यावर विखेंनी चादर चढवली. त्याचवेळी विखे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना सुरु असताना. विखेंच्या चेहऱ्यावरील स्मित हास्यही काही लपून राहिलं नाही. तर बाळासाहेब थोरातांनी मात्र, विखेंना चिमटा काढलाच. राधाकृष्ण विखे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात होते आणि दोघांची राजकीय कुस्ती बघता, विखेंच्या या कृतीवर थोरातांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतच. मात्र विखेंनी यावेळी प्रतिक्रिया नाहीत तर शायरीतून अप्रत्यक्षपणे थोरातांवर निशाणा साधला.