Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण
भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईः भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे कोरोनाचे हे लोण आता आमदारांमध्ये पसरते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.