Ratnagiri | अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे समुद्रामध्ये पोहण्यास बंदी

| Updated on: Nov 22, 2021 | 4:35 PM

दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झालीय.

कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी ही पहिलीच अंगारकी संकष्टी चतुथर्ती असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु झालीय. जवळपास एक ते सव्वा लाख भाविक या काळात येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे. शिवाय, यावेळी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे.

काही भरारी पथकं देखील नेमली जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. गणपतीपुळे येथे अंगाकरी निमित्त बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी, छोटे – मोठे स्टॉलधारक येत असतात. पण, यावेळी मात्र त्यांना मंदिर परिसरात स्टॉल लावता येणार नसून स्थानिक व्यापाऱ्यांचे दोन डोस झालेल्या असल्यास त्यांना प्राधान्य दिलं जाईल, असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.

ST Workers Strike: शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली, संपावर तोडगा नाहीच
एसटी कर्मचारी आणि जनतेच्या हितासाठी मध्यम मार्ग काढण्यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा: अनिल परब