तावूजींच्या निधनानं देशाचं नुकसान, राहुल बजाज म्हणजे सरकार आणि उद्योजकांमधील दुवा
राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झाले आहे. देशातील उद्योजक आणि सरकार यांच्यातील दुवा निकाळला असून मार्गदर्शन करणारे व्यक्तीमत्व हरपल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झाले आहे. देशातील उद्योजक आणि सरकार यांच्यातील दुवा निकाळला असून मार्गदर्शन करणारे व्यक्तीमत्व हरपल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्या म्हणाल्या की, आमचे आणि बजाज कुटुंबीयांचे गेल्या पाच दशकापासून जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना आपण तावूजी म्हणत असल्याचे सांगितले. राहुल बजाज यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव होता आणि आजची त्यांची ही पिढीही हे विचार पुढे चालवत आहेत अशी भावना व्यक्त केली. सरकारला जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर राहुल बजाज यांचे मार्गदर्शन महत्वाचे असायचे, त्यांच्या जाण्यामुळे देशातील सरकार आणि उद्योजक यांच्यातील दुवा निखळल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.