Rahul Bajaj Passes Away | ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

| Updated on: Feb 12, 2022 | 8:23 PM

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं आज दु:खद निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज समुहाच्या उभारणीमध्ये राहुल बजाज यांचं मोठं योगदान राहिलं आहे. बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात उपचार सुरू होते.

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं आज दु:खद निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज समुहाच्या उभारणीमध्ये राहुल बजाज यांचं मोठं योगदान राहिलं आहे. बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हार्ट आणि लंग्स संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे उपचाराला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. हळहळू त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राहुल बजाज यांचे पार्थिव रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Sudhir Mungantiwar | महाराष्ट्रात एकच निर्णय घेतला जातो, पियो वाईन आणि रहो फाईन
महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन प्रेशरमध्ये काम करतंय हे दुर्दैवी – नवनीत राणा