प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी; नेमकं काय झालं?
प्रयागराज येथील राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेला भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. राहुल गांधी स्टेजवर असताना जमाव दाटीवाटीने बसलेला होता पण अखिलेश यादव आल्यानंतर जमावाने स्टेजकडे धाव घेतली. लोक नियंत्रणाबाहेर जात असल्याने दोन्ही नेत्यांनी आपली भाषणं अटोपती घेतली.
उत्तर प्रदेशात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची क्रेझ पाहायला मिळाली. प्रयागराज येथील सभेला भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. सभेसाठी आलेल्यांनी बॅरिकेट्स तोडून मंचावर धाव घेतल्याचे पाहायला मिळाले. तर राहुल गांधी, अखिलेश यादवांना जवळून पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. खास करून अखिलेख यादव यांच्या एन्ट्रीनंतर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. राहुल गांधी स्टेजवर असताना जमाव दाटीवाटीने बसलेला होता पण अखिलेश यादव आल्यानंतर जमावाने स्टेजकडे धाव घेतली. लोक नियंत्रणाबाहेर जात असल्याने दोन्ही नेत्यांनी आपली भाषणं अटोपती घेतली. विजयाचा विश्वास व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी आपली पुढची सभा फुलपर येथे घेतली. येथेही मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली. नेमकं असं काय घडलं की उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जमावाची गर्दी उसळली. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: May 20, 2024 11:56 AM