खासदारकी गेली आता बंगलाही जाणार? राहुल गांधी यांना काय आली नोटीस?

| Updated on: Mar 27, 2023 | 7:45 PM

VIDEO | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतरही करावा लागतोय अडचणींचा सामना, लोकसभा आवास समितीनं काय बजावली नोटीस

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर राज्यभरात काँग्रेस नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले गेल्यानंतर काँग्रेससाठी आणखीन एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभेची खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना आता त्यांचा सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. याबाबतची नोटीसही लोकसभा आवास समितीकडून राहुल गांधी यांना बजावण्यात आली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांना आपलं बिऱ्हाड आता दुसरीकडे हलवावं लागणार आहे. एकीकडे खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना आता बेघर व्हावे लागणार असल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांना देण्यात आलेला सरकारी बंगला सोडण्याचं सांगण्यात आलं आहे. राहुल गांधी संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना बंगला खाली करण्याचे निर्देश या नोटिसमधून देण्यात आले आहेत. राहुल गांधी सध्या 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहत आहेत. त्यांना 30 दिवसात म्हणजे 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे.

Published on: Mar 27, 2023 07:45 PM
वयाच्या 6 व्या वर्षी चिमुकलीनं रचला एव्हरेस्ट सर करत इतिहास, पुढचं मिशन काय?
स्वातंत्र्यवीर सावरकर आज असते तर…, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात