शरद पवार प्रेरणा देतात, Rahul Gandhi यांना धडा देण्यासाठी मोदींकडून पवारांवर कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Feb 08, 2022 | 2:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यसभेत काँग्रेसच्या एकूणच कारकीर्दीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र हे करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यसभेत काँग्रेसच्या एकूणच कारकीर्दीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र हे करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पंतप्रधानांनी राहूल गांधींचं (Rahul Gandhi) नाव न घेता त्यांच्यावर टीका केली, मात्र यावेळी शरद पवार यांच्याकडून त्यांनी काहीतरी धडा घ्यायला हवा, आजारी अजूनही ते मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देतात, असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं. विशेष म्हणजे राज्यसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख करत त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2013 पर्यंत देशाने दुर्दशेत दिवस काढले. 2014 मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना जुने दिवसच दिसणार नाही, अशी जोरदार टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात चढ-उतार येत असतात. त्यातून व्यक्तीगत निराशा निर्माण होते, ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर असताना देशाची चिंता करायची नाही, असं असतं का? कुणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. तुम्ही नाराज होऊ नका. नाराज होत असाल तर तुमचे जे मतदार संघ आहेत तिथले लोकही उदास होतील, अशी खिल्ली नरेंद्र मोदी यांनी उडवली.

मोदींनी Congress च्या राज्यांवरील अत्याचारांचा पाढाच वाचला! | PM Modi at RajyaSabha
Sangliमध्ये विजेचा शॉक लागून मायलेकीचा जागीच मृत्यू