राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळणार, सुप्रीम कोर्टानं काय दिला मोठा निर्णय?
VIDEO | खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी राहुल गांधी यांना मोठा दिलासा, कोर्टात नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२३ | मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी खासदारकी लढविण्याचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सत्र न्यायालयाला फटकारलं आहे. ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची गरज काय होती? एवढी शिक्षा देण्यामागचं कारणही कोर्टाने दिलेलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.राहुल गांधी यांचं विधान आपत्तीकारक होतं. मात्र, एवढी मोठी शिक्षा देण्याचं कारण कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केलेलं नाही. तसेच त्यावर गुजरात उच्च न्यायालयाने विचारही केला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तर मोदी आडनाव घेतल्याने कुणाचीही बदनामी झाली नाही. पण राहुल गांधी यांनी बोलताना जपून प्रतिक्रिया द्यावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.