… ही राजकीय भूकंपाची सुरूवात, संजय राऊत यांनी काय केलं आमदार अपात्रतेच्या निकालावर सूचक वक्तव्य?
राहुल नार्वेकर आजारी पडले हा राजकीय भूकंप असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोला लगावला आहे. शिवसेना अमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुंबई, ७ जानेवारी २०२४ : राहुल नार्वेकर आजारी पडले हा राजकीय भूकंप असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोला लगावला आहे. शिवसेना अमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला आहे. तर राहुल नार्वेकर आजारी पडले आहेत, ही राजकीय भूकंपाची सुरुवात आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या सूचक वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असं वक्तव्य करत पलटवार केला.
Published on: Jan 07, 2024 03:15 PM