NCP MLA Disqualification : शिवसेनेचा निकाल लागला आता राष्ट्रवादी कुणाची, शरद पवार की अजित पवार?
राष्ट्रवादीच्या फुटीवरून येणारा निकाल हा ३१ जानेवारीपर्यंत येणार आहे. पण जसा निकाल शिवेसनेचा आला तसा राष्ट्रवादीचा निकाल येणार का? असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांच्याकडे जाणार की अजित पवार हे या महिन्यात ठरणार
मुंबई, १२ जानेवारी २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचा निकाल दिला आता राष्ट्रवादी नेमकी कुणाची याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीवरून येणारा निकाल हा ३१ जानेवारीपर्यंत येणार आहे. पण जसा निकाल शिवेसनेचा आला तसा राष्ट्रवादीचा निकाल येणार का? असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांच्याकडे जाणार की अजित पवार हे या महिन्यात ठरणार आहे. विधीमंडळातील संख्याबळ ज्याचं जास्त त्याचाच राजकीय पक्ष, असा निकाल शिवसेनेचा लागला. असा निकाल राष्ट्रवादीचा लागला तर अजित पवार यांच्याकडे ४१ आमदार आहेत तर शरद पवार यांच्याकडे १२ आमदार आहे. म्हणजेच विधीमंडळातील संख्याबळाचा विचार केला तर राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांच्याकडे जाऊ शकतो. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट, काय म्हणाले राहुल नार्वेकर?
Published on: Jan 12, 2024 11:33 AM