Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने, तरीही मुख्यमंत्री विधानसभाध्यक्षांवर नाराज?
निकालात राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील आमदार पात्र ठरवले आहेत. भरत गोगावले यांचा व्हिप योग्य पद्धतीने नव्हता त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरत नाही. असे राहुल नार्वेकर म्हणाले. मात्र ठाकरे गटाचा दबाव होता का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
मुंबई, १२ जानेवारी २०२४ : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला. मात्र या निकालात राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील आमदार पात्र ठरवले आहेत. भरत गोगावले यांचा व्हिप योग्य पद्धतीने नव्हता त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरत नाही. असे राहुल नार्वेकर म्हणाले. मात्र ठाकरे गटाचा दबाव होता का? असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोर्टात जाण्याचे संकेत दिलेत. शिवसेना शिंदे गटाकडे दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. मनमानी आणि घराणेशाहीला चाप बसला अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती वेगळी असती अशी चर्चा होती. मात्र राजीनामा दिला नसता तरी काही फरक पडला नसता असे नार्वेकर म्हणाले.