शिवसेनेच्या घटनेवरून कोणाचा पुरावा खरा? ठाकरे गटाचा तो पुरावा राहुल नार्वेकर यांनी फेटाळला
निकालावर ठाकरे गटानं महापत्रकार परिषद घेतली आणि ज्या घटनादुरूस्तीवरून वाद निर्माण झाला. त्या घटनादुरूस्तीची कागदपत्र निवडणूक आयोगाला दिल्याचा पुरावा ठाकरे गटाने काल सादर केला. मात्र राहुल नार्वेकर यांनी हा पुरावाच फेटाळून लावला आहे.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : शिवसेना पक्षाबद्दल राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं महापत्रकार परिषद घेतली आणि ज्या घटनादुरूस्तीवरून वाद निर्माण झाला. त्या घटनादुरूस्तीची कागदपत्र निवडणूक आयोगाला दिल्याचा पुरावा ठाकरे गटाने काल सादर केला. मात्र राहुल नार्वेकर यांनी हा पुरावाच फेटाळून लावला आहे. १९९९ ची घटना निवडणूक आयोगाने दिली. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी घटनादुरूस्ती केली. ती घटनाच निवडणूक आयोगाकडे देण्यात आली नाही. त्यामुळे १९९९ च्याच घटनेचा आधार घेऊन राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून अधिकार नसल्याचे म्हटले आहे. मात्र ४ एप्रिल २०१८ ला घटना दुरूस्ती आणि उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची कागदपत्र आयोगाला दिली असून त्याची पोच पावतीही ठाकरे गटाकडून दाखवण्यात आली. त्यावेळी आयोगाने जो पत्र व्यवहार केला त्यावर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अध्यक्ष शिवसेना असा करण्यात आलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट