… काय करायचं ते करा, राहुल नार्वेकर यांनी असं कोर्टाला सांगावं; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
राहुल नार्वेकर यांनी आता कोर्टाला सांगितलं पाहिजे की, मी आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात कोणताही निर्णय देत नाही, काय करायचं ते करा...असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर भाष्य करत असताना खोचक टोला लगावला आहे.
पुणे, ८ जानेवारी २०२४ : कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे जरी योग्य असलं तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात कोणताही निर्णय देत नाही हे चुकीचे आहे, हे मी मान्य करतो. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर राहुल नार्वेकर यांनी आता कोर्टाला सांगितलं पाहिजे की, मी आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात कोणताही निर्णय देत नाही, काय करायचं ते करा…असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर भाष्य करत असताना खोचक टोला लगावला आहे. स्पीकर हा कयतेखाली येऊ शकत नाही. तर सोमनाथ चॅटर्जी हे जेव्हा लोकसभेचे स्पीकर होते त्यावेळी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तर या नोटीसला प्रत्युत्तर देताना त्यांनी असे म्हटले होते की, ज्यांनी मला नोटीस पाठवली त्यांनाच मी समन्स बजावत आहे आणि तुम्ही हजर कसे राहत नाही हे मी बघतो, असे सोमनाथ चॅटर्जी म्हणाले होते. यानंतर वादा-वादी झाली आणि सुप्रीम कोर्टाने चूक झाल्याचे कबूल केले आणि सांगितले की स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही, असा किस्सा प्रकाश आंबेडकर यांनी शेअर केला.