बंद मुट्ठी लाख की… राहुल नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवर एका वाक्यात प्रत्युत्तर
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंसह राहुल नार्वेकर यांच्यावरही हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंसह राहुल नार्वेकर यांच्यावरही हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. बंद मुट्ठी लाख की खुल गई तो खाक की, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला जशासतसे प्रत्युत्तर दिलं आहे. निकाल देताना कोणते निकष वापरले याचीही माहिती दिली आहे. मी 10 जानेवारी 2024 रोजी अपात्रतेचा निकाल वाचून दाखवला. तो जाहीर केल्यावर आज सहा दिवस सातत्याने अनेक माध्यमातून अनेक लोकं विशेषत: काही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाजात गैरसमज पसरवत असल्याचे त्यांनी म्हटलं. तर नार्वेकर पुढे असेही म्हणाले, कोर्टाने मूळ पक्ष ठरवायला सांगितलं होतं. त्यानुसार मी मूळ पक्ष ठरवला. त्यानंतर मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे पाहून व्हीप नियुक्त केला. मूळ पक्ष ठरवण्यासाठी मी आधी त्या पक्षाची घटना पाहिली. पण त्यांची घटना माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे घटना मागितली आणि त्यानुसार निर्णय दिला.