Rahul Shewale : मुंबई सफाई कामगारांना घरं देणार, राज्य सरकारच्या निर्णयाचं राहुल शेवाळेंकडून कौतुक

| Updated on: Aug 24, 2022 | 6:34 PM

वर्षभर बैठक मागितली होती. पण, बैठक झाली नाही. सफाई कर्मचाऱ्यांचं म्हणणं तत्कालीन सरकारनं ऐकलं नव्हतं. आता सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याचं राहुल शेवाळे म्हणले.

एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, दिल्लीत केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची भेट घेतली. राजस्थानातील आठ वर्षांचा दलित विद्यार्थ्याला मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. केंद्रानं योग्य ती दखल घेऊन त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनी मुंबईतील सफाई कामगारांना घर देण्याचा निर्णय अत्यंत चांगला आहे. मालकी हक्काचं घर त्यांना मिळणार आहे. मनपा आय़ुक्तांनी सफाई कामगारांची फसवणूक केली होती. वर्षभर बैठक मागितली होती. पण, बैठक झाली नाही. सफाई कामगारांचं म्हणणं तत्कालीन सरकारनं ऐकलं नव्हतं. आता सफाई कामगारांना न्याय मिळाला असल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.

Published on: Aug 24, 2022 06:33 PM
Supriya Sule : देशात महागाई मात्र मूळ मुद्द्यापासून भरकटवण्याचा भाजपाचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची पुण्यात टीका
Special Report | ठाकरेंचा ‘तो’निर्णय, आता फडणवीस बदलणार ?