Kokan Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवसांचा मेगाब्लॉक; जाणून घ्या कधी अन् कुठे?
येत्या ३० जून ते ३० जुलैदरम्यान कोकण रेल्वेकडून हा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेच्या या मेगा ब्लॉकच्या कामादरम्यान, कोकण रेल्वेच्या नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत राहणार असल्याचे कोकण रेल्वेने प्रवाशांना कळविले आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलवर यार्ड फिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने तब्बल एक महिन्याचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या ३० जून ते ३० जुलैदरम्यान कोकण रेल्वेकडून हा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेच्या या मेगा ब्लॉकच्या कामादरम्यान, कोकण रेल्वेच्या नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत राहणार असल्याचे कोकण रेल्वेने प्रवाशांना कळविले आहे. तिरुवनंतपूरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनल (१६३४६) या नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकावर समाप्त होणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनल- तिरुवनंतपूरम सेंट्रल (१६३४५) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनलऐवजी पनवेल स्थानकातून सुरू होईल. यासोबत दररोज धावणाऱ्या मंगलुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनल (१२६२०) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास पनवेलस्थानकावर समाप्त केला जाणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनल- मंगळुरू सेंट्रल (१२६१९) मत्स्यगंधा एक्स्प्रेस दररोज सांयकाळी ४:२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे.