Odisha Train Accident | रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची अपघातस्थळाची पाहणी, म्हणाले…

| Updated on: Jun 03, 2023 | 10:01 AM

VIDEO | रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातस्थळाची केली पाहणी, घटनेतील मृतांबाबत काय केलं भाष्य?

ओडिशा : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले. यावेळी वैष्णव यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, हा मोठा भीषण अपघात आहे. आमच्या प्रार्थना सर्व दिवंगत आत्म्यांसोबत आहेत. शुक्रवारी रात्रीपासून रेल्वे, एनडीआरएफ, राज्य सरकार सातत्याने बचावकार्य युद्ध पातळीवर करत आहेत. एवढ्या मोठ्या अपघातात ज्या प्रकारचे प्रयत्न व्हायला हवेत, यासाठी ठिकठिकाणी लोकांना बोलावण्यात आले आहे. या अपघातात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्या संवेदना त्या कुटुंबांसोबत आहेत ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले आहेत. जिथे जिथे उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध असतील तिथे त्या पुरविल्या जातील. शुक्रवारी रात्री अपघातातील जखमी आणि प्राण गमावलेल्यांना नुकसान भरपाईची मदत रेल्वेने जाहीर केली आहे. तर अपघाताचे कारण काय? असे विचारले असता ते म्हणाले, उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या अपघाताच्या मुळाशी जाणार. अपघात का झाला, याचं कारण त्यामुळे लक्षात येईल. तपासानंतरच काही सांगता येईल. तपास होऊ द्या. सध्या सर्व लक्ष लोकांवर उपचार आणि बचाव कार्यावर आहे.

Published on: Jun 03, 2023 09:57 AM
नांदेडच्या रँचोची कमाल! चक्क दुचाकीच्या साहाय्याने बनवली लिफ्ट
अजित पवार यांनी राऊत यांना पुन्हा फटकारलं; म्हणाले, ”तारतम्य”, आता कारण काय?