गोंदियातील हरदोली-मांडोदेवी रस्त्याची झाली चाळण, नागरिकांना मनस्ताप; बघा दयनीय अवस्था

| Updated on: Aug 04, 2023 | 10:54 AM

VIDEO | मुसळधार पावसामुळे गोंदियातील अनेक रोड आणि रस्त्यांची दयनीय स्थिती, नागरिकांना सहन करावा लागतोय मोठा मनस्ताप

गोंदिया, 4 ऑगस्ट 2023 | गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे अनेक रोड आणि रस्त्यांची दयनीय स्थिती आपणास पाहावयास मिळत आहे. अशातच अशातच हरदोली – मांडोदेवी या धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून या रस्त्यावरच आमगाव ते देवरी या रस्त्याचे बांधकाम करणारी पाटील कॉन्ट्रक्शन कंपनी यांची सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी संपूर्ण साईट आणि ऑफिस याच मार्गावर आहे. यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात भरलेल्या टेम्पोचा वावर असतो. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. या भारी टेम्पो आणि टिप्परच्या येण्या-जाण्यामुळे हा संपूर्ण रस्ता खड्डे झाला असून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून पूर्ववत करण्यात यावा आणि पाटील कंपनीवर योग्य ती कारवाई करावी असे नागरिक मागणी आता करीत आहेत.

Published on: Aug 04, 2023 10:54 AM
नितीन देसाई यांच्या मृत्युसंबंधी मोठी बातमी; एडलवाईज कंपनीचे सीईओ रॅशेस शाहांची चौकशी होण्याची शक्यता…
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावरील वाहतूक विस्कळीत