प्रतिक्षा संपली! आज मुंबईत पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्यानं म्हटलं…
VIDEO | येत्या 24 तासात बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होणार, चक्रीवादळाचा मुंबईला धोका?
मुंबई : येत्या 24 तासात बिपरजॉय हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्यामुळे या वादळाचा फटका हा कोकण किनारपट्टीसह गुजरातच्या किनारपट्टीला देखील बसू शकतो. तर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत आज पावसाची शक्यता आहे. 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे, असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. मात्र मुंबईला याचा फारसा धोका नाही आहे. काल मुंबई आणि आजूबाजूच्या भागात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे धुळीचे आणि वाळूचे लोट शहरभर पसरले होते. या जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उपनगरातील 16 वृक्ष हे उन्मळून पडले. हे बिपरजॉय चक्रीवादळ गोव्यापासून पश्चिमेस 700 किलोमीटर आणि मुंबईच्या नैऋतेस 630 किलोमीटर अंतरावर आहे. येत्या 48 तासात मान्सून हा गोव्यात दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन होईल असा अंदाज हा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे पण बिपरजॉय या चक्रीवादळाचा हा धोका मुंबईला फारसा नसणार आहे.