ऊन पावसाचा खेळ, ‘या’ जिल्ह्यात ५ दिवस अवकाळीचा इशारा तर आज तापमान ४४ डिग्रीवर

| Updated on: Apr 19, 2023 | 12:43 PM

VIDEO | तापमान वाढलं अन् नागरिक हैराण; आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. आजपासून पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला तर आज पारा 41 ते 42 डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे, काल अमरावतीत दुपारी तीन वाजता 44 डिग्री तापमान होतं तर आजपासून अमरावती जिल्हा सह विदर्भात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. यासह विजेच्या कडकडासह पावसाचा इशाराही अमरावती हवामान विभागाचे तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला आहे. तर आजपासून ढगाळ वातावरण असतानाही 41 ते 42 डिग्री तापमान राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली

Published on: Apr 19, 2023 12:43 PM
अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातील नेते करत आहेत; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट, नागपूर पोलीस आता करणार…