Maharashtra Rain | राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे.
राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. सप्टेंबर संपत असताना पाऊस संपूर्ण राज्यात धुमशान घालणार आहे. हवामान खात्याने याबाबत नवीन अपडेट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवसांत सर्वत्र गडगडाटासहीत पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा अंदाज वर्तवून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.