Raj Kundra Case | राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात जामीन मंजूर झाला
राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली होती. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे.
मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना जमीन मंजूर झाल आहे. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली होती. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे. रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे. अश्लील चित्रपट प्रकरणात दीर्घकाळ तुरुंगात राहिलेले उद्योगपती राज कुंद्रा यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचे पती राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते एका अॅपद्वारे प्रदर्शित करणे यासारख्या गंभीर आरोपांमुळे अटक करण्यात आली होती. आता राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.