राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार – बाळा नांदगावकर

| Updated on: Jul 26, 2022 | 5:45 PM

"राज ठाकरे नेहमीच स्पष्ट, परखड बोलतात. जे त्यांच्या पोटात असतं, तेच ओठात असतं. त्यामुळेच ते त्यांची भूमिका ठामपणे मांडत असतात. बऱ्याचशा लोकांना ती भूमिका आवडलेली दिसते"

मुंबई: “राज ठाकरे नेहमीच स्पष्ट, परखड बोलतात. जे त्यांच्या पोटात असतं, तेच ओठात असतं. त्यामुळेच ते त्यांची भूमिका ठामपणे मांडत असतात. बऱ्याचशा लोकांना ती भूमिका आवडलेली दिसते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो” असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. “राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. हे मी आज नाही, वर्षानूवर्ष बोलत आलोय. राज ठाकरे जे बोलतात ते लोकांना भावत. शिंदे आणि फडणवीस सरकार बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जातील, असं वाटतय” असं नांदगावकर म्हणाले. “बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जन्म दिला पण आमच्यासारखे करोडो, लाखो कार्यकर्त्यांना कर्म देऊन जन्म दिलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंपेक्षा आमचा जास्त अधिकार आहे. त्यांनी आम्हाला मोठ केलय. बाळासाहेब एक विचार, संस्कार होता” असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Published on: Jul 26, 2022 05:45 PM
कोणात्या तोंडाने लोकांकडे मत मागायची? शहाजी बापू पाटलांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
‘उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळायला राऊतांनी मुलाखत घेतली’