Raj Thackeray Video : ‘अरे हाड… कोण पिणार ते पाणी?’, गंगेच्या प्रदूषणावर राज ठाकरेंचं बोट अन् नव्या राजकीय वादाचा कुंभ सुरू

| Updated on: Mar 10, 2025 | 12:08 PM

नमामि गंगे नावाची योजना केंद्र सरकारने घेतली. गंगा स्वच्छतेची मोहीम घेतली बऱ्याच ठिकाणी गंगाला आपण माता म्हणतो म्हणजे तसं आपल्या दृष्टीने आई म्हणतो आणि त्या नद्यांची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही. दरम्यान राजकारण्यांच्या वेगळ्या हिंदुत्वापासून सावध रहा असं म्हणत मनोज जरांगेंनी कुंभमेळा आणि औरंगजेब या सध्या सुरू असलेल्या दोन्ही मुद्द्यांवरून राज ठाकरेंसह भाजपच्या भूमिकेवर सवाल केले आहेत.

कुंभमेळा संपला असला तरी राज ठाकरेंच्या विधानांनी नव्या राजकीय वादाचा कुंभ सुरु झालेलं आहे. कुंभमेळ्यामधून आणलेल्या गंगाजलावर बोलताना राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर टीका केली. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक उत्तर दिली. पण राज ठाकरेंवर बोलताना भाजप नेत्यांच्या टीकेत मात्र थोडासा संयम देखील दिसलेला आहे.  गंगेतल्या प्रदूषणाबद्दल आसूड ओढत राज ठाकरेंनी नाव न घेता भाजपच्या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेवरचं सवाल केला आहे. प्रदूषणामुळे अरे हाड.. असं म्हणत त्यांनी बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल प्राशन करण्यासही नकार दिला. त्यांच्या विधानावरून संयम शब्दात का होईना पण भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. राज कपूर आणि राम तेरी गंगा मैली सिनेमाच उदाहरण देत राज ठाकरेंनी लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातून बाहेर येण्याचाही आवाहन केलं आहे. राज कपूरानी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ… त्याच्यात वेगळीच गंगा… लोकं म्हणाले अशीच गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. आजून पण गंगा काही साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतून बाहेर या जरा सगळ्यातनं डोके हलवा नीट, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी थेट श्रद्धा आणि अंधश्रद्धेचं उदाहरण दिलं. यावर एरवी अशा प्रत्येक धार्मिक विधानांवर आक्रमक होणाऱ्या भाजप नेत्यांनी मात्र राज ठाकरेंच्या विधानावर संयमी प्रतिक्रिया दिली आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 10, 2025 12:08 PM
Aurangzeb Treasure Video: शेतात सोनं अन् मुलघांचा खजिना असल्याची चर्चा, अफवा वाऱ्यासारख्या पसरली; रातोरात ‘या’ किल्ल्यावर लोकांची झुंबड
Rohit Pawar News : आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार