Video | मनसेच्या नव्या झेंड्याबद्दल लोकांना अनेक प्रश्न, राज ठाकरेंनी मांडली पक्षाची भूमिका
मनसेचा सध्याचा झेंडा पक्षस्थापनेपासूनच माझ्या डोक्यात होता. तो मला सतत आणायचा होता. तो कधी आणायचा हे सगळं सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी तो झेंडा आणायचा हे ठरवलं. ही गोष्ट पहिल्यापासून माझ्या डोक्यात होती. माझा जन्म हा कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत. हे लक्षात ठेवावे,” असं ठाकरे यांनी म्हटलंय.
मुंबई : मनसेचा बदलेला झेंडा आणि राज ठाकरे यांची बदलेली भूमिका याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. यावर बोलताना राज ठाकरे यांनी हा झेंडा आणण्याचा माझा पूर्वीपासून विचार होता, असं सांगितलंय. “मनसेचा सध्याचा झेंडा पक्षस्थापनेपासूनच माझ्या डोक्यात होता. तो मला सतत आणायचा होता. तो कधी आणायचा हे सगळं सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी तो झेंडा आणायचा हे ठरवलं. ही गोष्ट पहिल्यापासून माझ्या डोक्यात होती. माझा जन्म हा कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत. हे लक्षात ठेवावे,” असं ठाकरे यांनी म्हटलंय.