Eknath Shinde : असं नेमकं काय झालं? राज ठाकरे अन् शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर मुख्यमंत्री स्पष्ट म्हणाले….

| Updated on: Nov 17, 2024 | 5:54 PM

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय फाटलं की ते शिवसेना पक्ष आणि चिन्ह ढापलं अशी टीका वारंवार करू लागले? असा सवाल या मुलाखतीत केला असता एकनाथ शिंदे यांना यावर मनमोकळेपणाने आपली प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चांगले संबंध होते. मात्र असं नेमकं काय झालं? राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय फाटलं की ते शिवसेना पक्ष आणि चिन्ह ढापलं अशी टीका वारंवार करू लागले? असा सवाल या मुलाखतीत केला असता एकनाथ शिंदे यांना यावर मनमोकळेपणाने आपली प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही 9 मराठी’ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी शिंदे म्हणाले, ‘काय बोलायचं, काय ठेवायचं, काय नाही बोलायचं हा त्यांचा विषय आहे. निवडणुकीला ते सामोरे जाताय आम्ही जातोय. आमच्या दोघांची समन्वयाची भूमिका राहिली आहे. मला वाटत नाही पण निवडणुकीच्या भाषणात एकमेकांवर टीका होते.’, दरम्यान, माहिममध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार दिल्याने टीका होतेय का? यावर बोलताना ते म्हणाले, ‘माहिम मतदारसंघात आमचा शिवसेनेचा सत्ताधारी आमदार आहे. कारण कार्यकर्त्यांना त्यांना ही सांभाळायचंय आम्हालाही.. आजही आमचा काही वाद-विवाद नाही.’ , असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Published on: Nov 17, 2024 05:54 PM
Eknath Shinde : महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की…? ‘टिव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत काय म्हणाले मुख्यमंत्री?
शरद पवारांच्या पत्नीला बारामतीच्या टेक्सटाईल कंपनीत जाण्यापासून रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्… नेमकं काय घडलं?