VIDEO : Raj Thackeray यांनी शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन करत कार्यकर्त्यांना दिली शपथ
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. राजेशाही थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला मनसैनिकांनी हजारोच्या संख्येत उपस्थिती लावली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली.
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. राजेशाही थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला मनसैनिकांनी हजारोच्या संख्येत उपस्थिती लावली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली. “आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणी नंतर महाराजांनी जी सुराज्याची बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्व जण प्रयत्नांची पराकष्ठा करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू”, अशी शपथ राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली.