VIDEO : Raj Thackeray | राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पुण्यातून, तूर्तास मुंबईकडे रवाना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा पुढे ढकलला असून, त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ 15 डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे. या दौऱ्यात राज पश्चिम महाराष्ट्रात मनसेची मोट बांधणार असल्याचे समजते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा पुढे ढकलला असून, त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ 15 डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे. या दौऱ्यात राज पश्चिम महाराष्ट्रात मनसेची मोट बांधणार असल्याचे समजते. ऐन महापालिका निवडणुकांवर राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. यावेळी उपशहराध्यक्ष, नगरसेवक आणि विभागप्रमुखांशी राज ठाकरे साधणार संवाद साधणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्रत दौऱ्याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. येथे 15 आणि 16 डिसेंबर रोजी मनसेचा मेळावा होणार आहे.