चिमुकल्या फॅनच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले थेट या मनसैनिकाच्या घरी
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमधल्या दापोडी येथील मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मिळ आजार असलेल्या राज विशाल देशपांडे यांची भेट घेतली. राज ठाकरे घरी आल्याने आईला अश्रू अनावर, तर वडिलांना विठ्ठल भेटल्याची भावना केली व्यक्त
पुणे, २३ ऑगस्ट २०२३ | राजकारणातील नेते मंडळीचा एक वेगळाच चाहता वर्ग असतो. यामध्ये तरूणाई आकर्षित करणारा राजकीय नेता म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. आपल्या वत्कृत्व शैलीमुळे राज ठाकरे यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. अशातच एका चिमुकल्या फॅनच्या भेटीसाठी राज ठाकरे थेट या मनसैनिकाच्या घरी पोहोचली आहे. त्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मिळ आजार झालेला, या आजारामुळे त्याची शाळा ही बंद झालेली. पण राज ठाकरे यांच्यावर त्यांचे प्रचंड प्रेम. म्हणूनच त्याने मनसैनिक असलेल्या आपल्या वडिलांना ही इच्छा बोलून दाखवली आणि आज पिंपरी चिंचवडमधल्या दापोडी इथ असलेल्या राज विशाल देशपांडे या छोट्या मनसैनिकाला भेटायला आले. राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावीत अशी त्याची इच्छा आहे. राज ठाकरे यांनी त्याला चॉकलेट गेम्स भेट दिल्या तर त्याने त्यांना पेन दिला. राज ठाकरे आल्याने आईला अश्रू अनावर झाले, तर वडिलांना विठ्ठल घरी आल्याची भावना व्यक्त केली.