विधानसभेसाठी मनसेचे तीन शिलेदार रिंगणात, कोणाची कोणासोबत होणार संभाव्य लढत?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाकडून तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, संदीप देशपांडे या तिनही मनसे नेत्यांच्या उमेदवारीची घोषणा मनसेने केली. कोणाची कोणासोबत होणार संभाव्य लढत?बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. या निवडणुकीसाठी मनसेने आपले तीन शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाकडून तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, संदीप देशपांडे या तिनही मनसे नेत्यांच्या उमेदवारीची घोषणा मनसेने केली. वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे, शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. दरम्यान, वरळीत मनसेचे संदीप देशपांडे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर विरोधात ठाकरे गटाचे अजय चौधरी तर पंढरपूरमध्ये दिलीप धोत्रेंच्या विरोधात भाजपचे समाधान आवताडे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट