महायुतीचं मनसेबाबत काय ठरलं… मनसे लोकसभा लढणार की नाही? सस्पेन्स कायम
लोकसभा निवडणुकीकरता अर्ज दाखल करण्यास सुरूवात झालीये. मात्र मनसेकडून अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही राज ठाकरेंसंदर्भात भाजपने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मनसे लोकसभा लढणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम
महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांकडून लोकसभा निवडणुकीकरता अर्ज दाखल करण्यास सुरूवात झालीये. मात्र मनसेकडून अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही राज ठाकरेंसंदर्भात भाजपने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मनसे लोकसभा लढणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. ९ मार्चला राज ठाकरे म्हणाले होते की, निवडणुकीत काय निर्णय घ्यायचे ते लवकरच सांगणार, त्यानंतर दिल्लीत राज ठाकरे यांनी अमित शहा यांची बैठक घेतली त्यानंतर मुंबईत शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. मात्र महायुतीचं मनसेबाबत काही ठरलेलं नाहीये. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २७ मार्चला संपली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ४ एप्रिलला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पहिल्या २ टप्प्यातील विदर्भ, मराठवाड्यातील १३ मतदारसंघात अद्याप मनसेचा उमेदवार नाहीये. त्यामुळे मनसे लोकसभा लढणार की नाही? हे स्पष्ट होत नाहीये…बघा स्पेशल रिपोर्ट…