मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा खळखट्ट्याक! काय दिला इशारा?
मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत दुकांनावर मराठी पाट्या लावण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. या आदेशाचं पालन मुंबई न झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. लवकरात लवकर दुकांनावर मराठी पाट्या न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील मनसेने दिलाय.
मुंबई, २८ जानेवारी, २०२३ : मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर दुकानांवर मराठी पाट्या लावणं अनिवार्य आहे. मात्र तरीही काही ठिकाणी मराठी पाट्या न लागल्याने मनसे आक्रमक झाली आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत दुकांनावर मराठी पाट्या लावण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. या आदेशाचं पालन मुंबई न झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. सोलापूरमधील दुकांवरील इंग्रजी असणारे बोर्ड मनसैनिकांनी फोडले. लवकरात लवकर दुकांनावर मराठी पाट्या न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील मनसेनं दिला आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. दुकांनावर मराठी पाट्या लावण्याचं आवाहन भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.