महाराष्ट्राचा बिहार, उत्तरप्रदेश…. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 05, 2024 | 2:39 PM

पोलीस चौकीमध्ये कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, गणपत गायकवाड गोळीबार प्रकऱणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे.

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : पोलीस चौकीमध्ये कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, गणपत गायकवाड गोळीबार प्रकऱणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आता चार दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, अशीच जर परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. तर कल्याणमध्ये भर पोलीस स्थानकात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला ही घटना म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश होतोय का? की झालाय? असा सवाल उपस्थित करून गणपत गायकवाड प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Feb 05, 2024 02:39 PM
ओल्या काजूची उसळ, कोळंबी भात, पुरणपोळी अन्… उद्धव ठाकरे यांच्यासाठी कुणाकडून खास मेन्यू?
मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलं कारण