राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर
अयोध्याच्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात सभा घेणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पुण्यात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अयोध्याच्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात सभा घेणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पुण्यात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर(Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र त्याच्या या दौऱ्याला विरोधाचे ग्रहण लागले आहे. उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीय लोकांची माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश करून देऊ अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्याचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर येणार असून पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधणार आहेत.