“एकाने मला विचारलं ‘कसलं ऑपरेशन?”, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

| Updated on: Aug 23, 2022 | 2:05 PM

मागील दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीवर असलेले मनसे अध्यक्ष आता सक्रिय झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला. याप्रसंगी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

“मला एकाने विचारलं कसलं ऑपरेशन झालं. मी म्हटलं हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं. ते म्हणाले, हिपरिप्लेसमेंट, कशामुळे? मी म्हणालो, जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी जी माझी लावली ना… म्हटलं बदलायचीच वेळ आली. एकएक काय काय येतात हो. हार्ट रिपलेसमेंट असते. किडनी रिप्लेसमेंट वगैरे वगैरे. एकाने सांगितलं हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार. मी म्हटलं कसं दिसेल. बरं माझं ऑपरेशन म्हणून कोण काढून देईल. साहेब बरं दिसत नाही. माझी घ्या. काय काय प्रश्न विचारतात,” असं राज ठाकरे म्हणाले. मागील दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीवर असलेले मनसे अध्यक्ष आता सक्रिय झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला. याप्रसंगी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

Published on: Aug 23, 2022 02:05 PM
Rohit Pawar On Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही – tv9
डॉक्टरांनी विचारलं “कोव्हिड झाला होता का?”, राज ठाकरेंनी सांगितला अनुभव