Video : राज ठाकरे पुण्यासाठी रवाना, पाहा व्हीडिओ…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या ते शिवतीर्थवरून पुण्याकडे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसोबत स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेशच राज […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या ते शिवतीर्थवरून पुण्याकडे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलाय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसोबत स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मागील आठवडाभर राज्यातील राजकारण या एकाच मुद्द्यावर पेटतं राहिलं. राज यांची आक्रमक भूमिका आणि मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राज्य सरकारचीही सावध भूमिका पाहायला मिळाली.
Published on: May 07, 2022 02:56 PM