Nana Patole : जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरेंचे दौरे
देशात रोज महागाई वाढत आहे. मुख्य जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) दौरे आयोजित करण्यात आले आहेत, असं नाना पटोले म्हणाले.
देशात रोज महागाई वाढत आहे. मुख्य जनतेचे प्रश्न टाळण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) दौरे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच त्यानंतर ते रद्द देखील करतात. आम्हाला धर्माच्या गोष्टी दुसऱ्यांकडून शिकायच्या नाहीत. देशात दररोज रुपया खाली पडत आहे, त्यामुळे मनसेला (MNS) म्हणणं आहे की धार्मिक विषय सोडावा. संभाजी महाराज यांचा आम्ही आदर करतो, आमच्यासोबत त्याची कोणतीही बोलणी झालेली नाही. संभाजी राजे यांच्या नावाला विरोध नाही, आमच्याकडे देखील जास्तीची मते आहेत असं नाना पटोलेंनी (Nana Patole) मीडियाला सांगितलं.