Raj Thackeray : राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, भोंग्यांबाबत ट्विटरवर भूमिका जाहीर करणार
आज सकाळी नऊ वाजल्यापासून राज ठाकरेंच्या घरी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. परंतु सध्या त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मुंबई – राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घराबाहेर सुरक्षा वाढवली. गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर त्यापुढे हनुमान चाळीसा (Hanuman Chalisa) लावा अशी भूमिका घेतली. तेव्हापासून राज्यातलं राजकारण अधिक तापलं आहे. परवा औरंगाबादच्या (Aurangabad) जाहीर सभेत देखील त्यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं जाहीर केलं. तसेच या पुढची भूमिका मी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करणार असल्याचं सु्ध्दा त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला 3 तारखेचा अल्टीमेटम दिला होता. आज सकाळी नऊ वाजल्यापासून राज ठाकरेंच्या घरी काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. परंतु सध्या त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Published on: May 03, 2022 12:24 PM