मनसेचं इंजिन महायुतीच्या ट्रॅकवर? अमित शाह-राज ठाकरेंच्या भेटीत काय चर्चा?
दिल्लीत अमित शहा आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. याच भेटीत मनसेचा महायुतीत समावेश आणि जागावाटपावर चर्चा झाली. मनसेला दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डीपैकी १ अशा दोन जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुबंई, २० मार्च २०२४ : महायुतीमध्ये मनसेच्या रूपाने चौथा पक्ष लवकरच सहभागी होणार हे स्पष्ट झालंय. दिल्लीमध्ये राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हटले आहे. तर मनसेला दोन जागा मिळणार असल्याचीही चर्चा होतेय. दिल्लीत अमित शहा आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. याच भेटीत मनसेचा महायुतीत समावेश आणि जागावाटपावर चर्चा झाली. मनसेला दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डीपैकी १ अशा दोन जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित-शाहांनी राज ठाकरेंना एक-दोन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक करून जागा वाटप आणि महायुतीत येण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असं सांगितलंय. दक्षिण मुंबईत महायुतीतून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारीची शक्यता आहे. तर ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा खासदारकीसाठी मैदानात आहे. तर नाशिक किंवा शिर्डीचा विचार केला तर नाशिकमध्ये मनसेचा चांगला प्रभाव आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती आणि महापौरही होता. त्यामुळे नाशिकची जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे.