Raj Thackeray Thane LIVE | राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, महापालिका निवडणुकीचा मुद्दा मुख्य अजेंडा
ठाण्यात गेली अनेक वर्षे मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून पालिका स्थरावर कुणीही दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती कशी भरून निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप बरोबर जवळीकीचा विचार याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाण्यातील CKP हॉलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. या संवादात ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हेच पाहणं गरजेचं आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून पालिका स्थरावर कुणीही दिसून आलेला नाही. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती कशी भरून निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच भाजप बरोबर जवळीकीचा विचार याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे शहरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनरबाजी आणि मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत.